ओबीसींचा पुन्हा सर्व्हे करण्याची पाळी आता केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आलीये. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकार कुठे कमी पडणार नाही, मात्र मुद्दामून खोडा घालण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात अशी भूमिका घेतली आहे. म्हणून फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्यप्रदेशात देखील ओबीसींचा आरक्षण गेलं आहे. उद्या कर्नाटक आणि यूपी मध्ये देखील हीच गोष्ट होणार आहे. त्यामुळे भाजपने ओबीसींच्या विरोधी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज डोंबिवलीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आयोजित शरद महोत्सवाला भेट देण्यासाठी आले होते . मुंबईहून डोंबिवली असा त्यांनी ट्रेन ने प्रवास केला .डोंबिवलीत कार्यक्रमस्थळी आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजप वर टीका केली .
मेरिट च्या मुलांवर अन्याय होऊ नये ,परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न -
सध्या शासकीय परिक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार उघडकीस येत आहे त्याबाबत बोलताना जयंत पाटील यानी एमपीएससीला सगळ्या परीक्षा घेता येणे शक्य नाही म्हणून हा वेगळा पर्याय मागच्या सरकारच्या काळात सुरू झाला . एजन्सीला या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली जाते मात्र काही एजन्सी ब्लॅक लिस्ट आहेत, काही एजन्सी याचा गैरफायदा घेणारे आहेत फार कमी एजन्सी आहेत सक्षम करण्यास परीक्षा देऊ शकतात .दोन दिवसापूर्वी गृहनिर्माण विभागाची म्हाडाची परीक्षा होती त्यात आरोग्य विभागात ज्यांनी असा गोंधळ घातला त्यांच्या मागावर पोलीस असताना ही माहिती कळली .याबाबत शंका आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तत्काळ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला .मेरिट च्या मुलांवर अन्याय होऊ नये ,परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न आहे.
येत्या केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या वाढणार -
गेल्या केडीएमसीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना भाजपमध्ये प्रवेश केला होता आता ते नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे राजकीय चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी काही नगरसेवक हे राष्ट्रवादी सेना इच्छुक आहेत मात्र योग्य वेळ आल्यावर निर्णय घेण्यात येईल तसेच येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीची नगरसेवकांची संख्या ही लक्षणीय वाढ झालेली असेल असं स्पष्ट केलं तर नवी मुंबई येथे महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला व महाविकास आघाडी झाली तर भाजपचा पराभव निश्चित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.