Jayant Patil : राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा या शिबिराचे राष्ट्रवादीकडून शिर्डीमध्ये 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यांनी आज सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवरही टीकास्त्र सोडले.


जयंत पाटील म्हणाले, केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर, महागाई, माध्यमांची मुस्कटदाबी यासह देशातील अनेक विषयांवर, प्रश्नांवर या शिबिरात मंथन होणार आहे. यावेळी जयंत पाटील राज्यातील प्रकल्प बाहेर जात असल्याने बेरोजगारांमध्ये निराशा निर्माण झाल्याचे म्हणाले. उद्योग टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, या सत्तेतील लोकांकडून निराशा झाल्याचे त्यांनी सांगितले.  



दरम्यान, त्यांनी आम्ही जी पोलीस भरती जाहीर केली तीच भरती हे सरकार जाहीर करत आहे, नवीन काही सरकारकडून काम होत नसल्याचा टोला लगावला. आज सामनातून फडणवीसांना कटूता संपवून कामाला लागा असे सांगण्यात आले आहे. यावरून विविध अर्थ काढले जात असताना जयंत पाटील यांनी सांगितले की, सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांना साद नसून आता त्यांनी राज्य कारभार चालू करावा असे सामनाच्या संपादकीयमधून म्हटलं आहे. चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आता सरकार स्थापन होऊन झाला आहे.  


एकनाथ शिंदे आणि भाजपला महाराष्ट्रमध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकीत लोक निवडून देतील का याची शाश्वती वाटत नाही, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मंत्रिमंडळ विस्तार केल्यास उरलेले आमदार उद्धव ठाकरेंकडे निघून जातील असे लोक सांगतात, असे त्यांनी सांगितले.  


इतर महत्वाच्या बातम्या