Mumbai: सध्या माध्यमांवर ऑनलाई रमीच्या वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. या जाहिरातींमध्ये अनेक मराठी, हिंदी कलाकार आपल्याला दिसतात. आता याच जाहिरातींना प्रसिद्धी देणारे कलाकार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागानं ऑनलाईन रमी (Rummy) खेळण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. 


राष्ट्रवादी (Nationalist Congress Party) चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे ऑनलाईन रमी (Rummy) खेळण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. बाबासाहेब पाटील यांनी पत्राद्वारे ही मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.


महाराष्ट्रात मटका किंवा पत्ते खेळण्यावर बंदी घातली आहे. जर एखाद्या गावात किंवा एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचे खेळ खेळताना आढळल्यास त्यांच्यावरची कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र ऑनलाईन रमीमधून सर्रास महाराष्ट्रात अवैध प्रचार सुरू आहे. वर्षाला सरासरी 20 हजार कोटीची उलाढाल आणि कर्जबाजारीपणामुळे शेकडो आत्महत्या होणाऱ्या या ऑनलाईन जुगारावर बंधन आली पाहिजेत, त्याचबरोबर या जुगाराला प्रोत्साहित करणाऱ्या कलाकारांवरसुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


ऑनलाईन रमीतून सर्रास महाराष्ट्रात अवैध धंद्या सुरू आहे. या धंद्याला आणखीन यशस्वी करण्यात मराठी चित्रपट कलाकार जाहिरात करून लोकांना रमी खेळण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. यामध्ये आघाडीचे मराठी कलाकार अंकुश चौधरी, अमेय वाघ, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, शिवाजी साटम, मनोज जोशी, शरद केळकर, श्रुती मराठे,उमेश कामात, संतोष जुवेकर, गौरी नलवडे, आणि अमृता खानविलकर यांसारख्या कलाकारांची नावे आघाडीवर आहेत. तसेच,  हिंदीतील अभिनेते ऋतिक रोशन, अन्नू कपूर, कुमार सानू, शक्ती कपूर, आलोक नाथ, रजा मुरदअनुप सोनी, मनोज वाजपेय, अली अजगर, शिशिर शर्मा यांचा सामवेश आहे. तर दुसरीकडे अशी सुद्धा मराठी आणि हिंदी नामांकित कलाकार आहेत की, ज्यांनी समाजावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून दारू गुटखा आणि अशा प्रकारच्या कुठल्याही जाहिराती नाकारले आहेत. ज्याने समाजाचं स्वास्थ खराब होईल. अशा अशा कलाकारांचा सुद्धा कौतुक आम्ही करतोच आहे. मात्र जी कलाकार नुसतं पैसे कमवण्याच्या उद्देशाने जर समाजाचं स्वस्त बिघडत असतील तर अशा कलाकारांवर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा होणंही महत्त्वाचं आहे, असं या पत्रामध्ये बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे. 


महाराष्ट्रात सोशल मीडियावर कुठल्या प्रकारचा अंकुश नसल्याने अशा प्रकारच्या ऑनलाइन जुगारामुळे अनेकांचे परिवार आणि घर उध्वस्त झाल्याची चित्र आहेत. आणि चित्रपट कलाकारांनी नैतिकतेचा विचार करून अशा प्रकारच्या जाहिरातींमध्ये सहभागी होऊन लोकांना प्रोत्साहित करण्याचे थांबावे जेणेकरून महाराष्ट्रातल्या लोकांचा संसार उध्वस्त होण्यापासून वाचेल. मात्र त्याचबरोबर कारवाईसाठी असलेले कायदे जुने झाले आहेत. ऑनलाईन गेमच्या नावाने चालणाऱ्या जुगारावर कारवायांना यंत्रणेवर मर्यादा आल्या आहेत. अपुऱ्या आणि जून्या कायद्यामुळे पोलिसांना कारवाई करता येत नसल्याने प्रचलित कायद्यात बदल करुन ऑनलाईन जुगारावर सुमारे 10 वर्षाची कारवाई करण्याची तरतूद असावी, अशी सुद्धा मागणी बाबासाहेब पाटील प्रदेशाध्यक्ष चित्रपट सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केली आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Jacqueline Fernandez: मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनला मोठा दिलासा; कोर्टाकडून दुबईला जाण्याची परवानगी