नवी दिल्ली: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत (NCP Crisis)  आजपासून  दिवस निवडणूक आयोगात (Election Commission)  सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगात  (Election Commission) होणाऱ्या या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) आज सुनावणीसाठी  उपस्थित राहणार आहे. आजत्या सुनावणीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा केल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणीसाठी अजित पवार उपस्थित राहणार आहेत. आज दोन्ही गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनावणीला आमनेसामने येण्याची शक्यता आहे.  


राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची या मुद्द्यावर निवडणूक आयोगात सुरू असलेल्या सलग तिसऱ्या सुनावणीत खासदार शरद पवार, खासदार  सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे तीन महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. पहिल्या सुनावणीच्या आधी शरद पवार मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटून आले होते.दुसऱ्या सुनावणीच्या वेळी देखील ते उपस्थित होते.  आज सलग तिसऱ्या सुनावणीत शरद पवार प्रत्यक्ष हजर  राहणार आहेत. शरद पवारांची निवडणूक आयोगातील सुनावणीच्या दरम्यान असणारी उपस्थिती  आणि अजित पवारांची अनुपस्थिती हा राजकीय वर्तुळात कायमच चर्चेचा विषय ठरला आहे.


अजित पवार दुपारी 12 वाजता दिल्लीत दाखल होणार


अजित पवार आज दिल्लीला येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान ते दिल्लीत येण्याची  शक्यता आहे. त्यानंतर चार वाजता निवडणूक आयोगात होणाऱ्या सुनावणीला ते उपस्थित राहण्यची शक्यता आहे. आजच्या सुनावणीला अजित पवार राहणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा  रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत.  दुसरीकडे शरद पवार देखील थोडयाच वेळात  दिल्लीत  दाखल होणार आहे. शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. 


शरद पवार प्रत्येक सुनवणीला उपस्थित 


निवडणूक आयोगातल्या सुनावणीत शरद पवारांची उपस्थिती ही कायमच  वैशिष्ट्यपूर्ण ठरली. राष्ट्रवादी फुटली, त्याआधी शिवसेना फुटली. राष्ट्रवादीची सुनावणी जशी निवडणूक आयोगात होत आहे, तशी सुनावणी शिवसेनेच्या बाबतीतही झाली. परंतु त्या सुनावणीच्या वेळी उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक आयोगात हजर राहिले नव्हते. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, परंतु तेथे देखील स्वतः उद्धव ठाकरे कोणत्याही सुनावणीच्या वेळी हजर नव्हते.मात्र या उलट निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टातली राष्ट्रवादीच्या बाबतीतली कायदेशीर लढाई शरद पवारांनी गंभीरपणे घेतली आहे. त्यामुळेच ते  सलग दोन सुनावणी स्वतः शरद पवार निवडणूक आयोगात हजर राहिले आहेत.


हे ही वाचा :


राष्ट्रवादी काकांना की पुतण्याला? निवडणूक आयोगात आजपासून घमासान, डे टू डे होणार सुनावणी