धुळे : विविध ठिकाणी शांततेत मोर्चा निघत असताना आता मराठा समाजात राजीनामास्त्र सुरु झालं आहे. धुळ्याचे नगरसेवक रविराज पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पदाचा राजीनामा दिला आहे.


रविराज ज्ञानेश्वर पाटील हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. दोंडाईचा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून ते निवडून आले होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डी बलात्कार आणि हत्याचे खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी रविराज पाटील यांनी राजीनामा दिला आहे.

धुळ्यात उद्या (28 सप्टेंबर) मराठा मूकमोर्चा मोर्चा होणार आहे. मात्र त्याआधीच पाटील यांनी नगरसेवक पद सोडलं आहे. आपल्या समाजाच्या मागणीसाठी नगरसेवकाने राजीनामा देण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असावी.