पुणे: शिरुरचा पुढचा खासदार कोण यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळतंय. शिरुरमधून खासदार म्हणून संसदेत कोण जाणार हे नेते नव्हे तर लोक ठरवतील असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी खासदार संजय राऊत यांना दिलं आहे. शिरुरमधून शिवाजीराव अढळराव पाटील हे संसदेत जातील असं खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्याला अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


काहीही झालं तरी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे पुढचे खासदार हे शिवाजीराव अढळराव पाटील असतील असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी  दोन दिवसांपूर्वी केलं होतं. त्याला आता खासदार अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं आहे. खासदार म्हणून कोण संसदेत जाणार हे लोक ठरवतील, नेते नव्हे असं अमोल कोल्हे म्हणाले. 


शिरुरमध्ये शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यामागे शिवसेना आणि उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे कोणी काहीही म्हणाले तरी शिवाजीराव अढळराव पाटील हे संसदेत जाणार असं खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, "शिरूर लोकसभेतून संसदेत खासदार म्हणून कोण जाणार, हे नेता नव्हे तर मायबाप जनता ठरवेल. शिवाजी आढळराव पाटील हे माजी खासदार म्हणून, अन्य मतदारसंघातून निवडून येऊ शकतात अथवा थेट राज्यसभेचे खासदार म्हणूनही ते संसदेत येऊ शकतात. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी अशी वक्तव्यं करावी लागतात. त्यामुळे खासदार संजय राऊतांच्या वक्तव्याकडे याच अनुषंगाने पहावे."


महत्त्वाच्या बातम्या :