Ajit Pawar on Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दोन्ही गटाकडून गर्दी जमण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईमध्ये ठाकरे-शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची लगबग सुरु असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोघांनीही मोलाचा सल्ला दिला आहे. मेळावे घेत असताना कोणीही कमरेखाली वार करु नयेत, तसेच खालच्या पातळीवर जावून टीका करु नये, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नाही, हे शाहू, फुले आंबेडकरांचा विचार नाही, असा सल्ला दिलाय.
अजित पवार बारामतीमध्ये बोलत होते. त्यांच्या हस्ते बारामतीतील कृष्ण दृष्टी रुग्णालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. केमिकल युक्त अन्नचा प्रादुर्भाव आपल्यावर होतोय. फास्ट फुडकडे यंग पिडीची लोक भर देतात. त्यामुळे आजरांचे प्रमाण वाढले. त्यासाठी सकाळी लवकर उठले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. वर्क फ्रॉम होम मुळे स्क्रिन जास्त बघायला लागली..त्यामुळे डोळ्यांचे प्रॉब्लेम वाढले आहेत. बारामतीत आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज करतो आहोत. त्यासाठी जागा पण पाहिली आहे. वैद्यकीय व्यवसाय करताना पैसे कमावणे हा उद्देश ठेवू नये. कोणताही व्यावसायिकाने सामाजिक भान ठेऊन काम केलं पाहिजे. सामाजिक भान हरवता कामा नये, असे अजित पवार म्हणाले. भारत देश हा मेडिकल टुरिझम म्हणून उदयास येत आहे. जेव्हा मी अर्थ मंत्री होतो तेव्हा आरोग्य विभागाच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी खूप निधी खर्च केला, कृपया दारू, गुटखा, यापासून लांब राहा, असेही अजित पवार यांनी उपस्थितींना सांगितलं. आम्ही मेडिकल क्षेत्रात काम करीत होतो. पण अचानक कोरोना आला. कोरोना आला की आपल्याला घरी लावलं, असेही पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांची सभा बघणार, त्या दोघांसोबत मी काम केलं आहे. दोघांनी बोलत असताना कंबरे खाली वार करू नये.. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पवार साहेब क्रिकेटचे अध्यक्ष होते. यावेळी ते कधी म्हणाले नाहीत की धोणीला घ्या. मी कब्बडी असोसिएशनचा अध्यक्ष आहे. त्यासाठी मी संघ नाही निवडत तो संघ सिलेक्टर टीम निवडते. आज दसरा आहे मलाही असं वाटतं की सोने द्यावे. सोनं म्हणजे खरं सोनं नाही.. आपट्याची पाने.. नाहीतर लोक म्हणतील ह्याची भूक लै वाढली आहे. मी लोकांना इतका वेळ देतो, निधी आणतो तरी मला कागद देतात.. महाराष्ट्रात अस कुठं बसस्थानक बघायला मिळणार नाही असं बस स्थानक होणार आहे. ज्यांच्या जास्त जागा त्याला थोडी जागा द्यावीच लागणार आहे. विकासासाठी जागा द्यावी लागेल, असे अजित पवार म्हणाले.