Nawab Malik vs Devendra Fadnavis : बॉम्ब फोडण्यासाठी दिवाळीनंतर कशाला वाट पाहाता? माझं अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं कुणीचं सिद्ध करु शकत नाही, असं आव्हान नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. माझे अंडरवर्ल्डशी संबंध होते, तर तुम्ही राज्याचे पाच वर्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतात, तेव्हा काय केलं? कारवाई का केली नाही? असाही सवाल मलिकांनी उपस्थित केला. नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आरोपाचा धमाका केलाय.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या मोठ्या आरोपाची आठवणही मलिकांनी यावेळी करुन दिली. पंचतारांकित हॉटेलमध्ये तुमच्या कार्यकाळात झालेली पार्टी दिसली नाही का? या पार्टीतील एका टेबलची किंमत 15 लाख रुपये होती. या पार्टीत नक्कीच ड्रग्ज वापरले गेले असतील. ही पार्टी तुम्हाला नाही का दिसली? असा सवाल मलिकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावेळी नवाब मलिक यांनी जावयाचा बचाव केला. शिवाय समीर वानखेडे आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले. 


समीर वानखेडे यांच्यावर आरोप -


नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत. समीर वानखेडे मुंबईत आल्यानंतर प्राव्हेट आर्मी उभी केली. या आर्मीनं कोट्यवधींची वसूली केली आहे. समीर वानखेडे यांनी मालदीवमध्ये कोट्य़वधी रुपायांची वसूली केली आहे. समीर वानखेडे एक लाख रुपायांची पँट घालतात. सत्तर हजार रुपयांचा शर्ट घालतात. दोन लाख रुपयांचे बूट घालतात. त्यांच्या मनगटावर लाखो रुपयांचं घड्याळ आहे. एखाद्या इमानदार आधिकाऱ्यांकडे इतके पैसे आले कुठून? असा सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केलाय. 


फडणवीस यांना प्रत्युत्तर -


माझ्या जावयाच्या घरातून गांजा जप्त केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. मात्र, जावयाच्या घरातून कोणताही आपत्तीजनक वस्तू सापडली नाही, यासंदर्भात तुम्ही तुमचे निकटवर्तीय समीर वानखेडे यांनाही विचारू शकतात, असं नवाब मलिक यांनी फडणवीस यांना सांगितलं. ‘बॉम्ब फोडण्यासाठी दिवाळीनंतर कशाला वाट पाहाता? माझं अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं कुणीचं सिद्ध करु शकत नाही. मागील 62 वर्षांपासून मुंबईत राहत आहे, असं आवाहन नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांना केलं.’ पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की, माझे जर अंडरवर्ल्डशी संबंध होते, तर फडणवीस मुख्यमंत्री असताना गृहखातं त्यांच्याकडे होतं, त्यावेळी त्यांनी माझ्यावर कोणताही कारवाई का केली नाही?   


एनसीबीवर गंभीर आरोप - 


नवाब मलिक यांनी यावेळी एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबी आधिकारी व्ही. व्ही सिंग यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जावयाला अटक केल्यानंतर व्ही. व्ही सिंह यांनी लँड क्रूझर या गाडीची मागणी केल्याचा आरोप केलाय.  व्ही. व्ही. सिंग आणि त्यांचा चालक माने समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीसोबत लोकांना फसवत आहेत. जेएनपीटी बंदरावर 15 दिवसांपासून 51 टन ड्रग्ज पडून आहेत. पण कारवाई का केली जात नाही? असेही मलिक म्हणाले. 


बॉलिवूड कलाकारांना अडकल्याचा आरोप -


वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीनं बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना लुबाडल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. अभिनेत्री सारा अली खान, दीपिका पदुकोण, श्रद्ध कपूर प्रकरणावरून मलिकांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना धारेवर धरलं. ते म्हणाले की, वानखेडे एनसीबीमध्ये आल्यानंतर 15/2020 हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात सारा अली, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोणला हजर केलं. मागील 14 महिन्यापासून हे प्रकरण सुरु आहे. आरोपपत्रही दाखल नाही. ना ते प्रकरण संपलं. असं काय आहे की 14 महिने हे प्रकरण बंदच होत नाहीये. यामध्ये कोट्यवधी रुपयांची वसूली करण्यात आली आहे. भितीपोटी एकजणही बोलत नाही. पण लवकरच सत्य समोर येईल. 


परमबीर सिंग कुठे गेले?


अनिल देशमुख यांना फसवलं आहे. परमबीर सिंह यांच्या मार्फत त्यांना फसवलं गेलं. परमबीर सिंहच्या माझ्यमातून राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. अनिल देशमुख काल ईडी कार्यालयात हजर राहिले. पण आरोप करणारे परमबीर सिंह कुठे गेले? राजकीय सुडापोटी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. राज्यातील नेत्यांना घाबरवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली. लूकआऊट नोटीस काढल्यानंतर देश सोडून कसं जाऊ शकतात. कोणत्या मार्गे ते देश सोडून गेले? केंद्रानं उत्तर द्यावं. भाजप सत्तेत असलेल्या राज्यातून परमबीर सिंह यांनी देशाबाहेर पळ काढला का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर-


काही लोक म्हणत आहेत की मी महिलांपर्यंत पोहचलो आहे. पण मागील 26 दिवसांत प्रकरणाशी संबंधित दोन महिला सोडून मी इतर कोणत्याही महिलांचा उल्लेख केला नाही. किरीट सोमय्यांनी काल अजित पवारांच्या आईचा बहिणीचा उल्लेख केला. यापूर्वी एकनाथ खडसे आणि संजय राऊतांच्या पत्नीबद्दल भाजपाच्या नेत्यांनी विधानं केली, त्याचं काय,” असा सवाल नवाब मलिक यांनी केला. मी कुणावरही हवेत आरोप केलेले नाही, असेही मलिक यांनी सांगितलं.  यावेळी नवाब मलिक यांनी आमृता फडणवीस यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.