मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या (Nawab Malik) जामीनाची प्रक्रिया आज पूर्ण होणार आहे.  नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.  प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) गेल्या आठवड्यात मान्य केलीये. या जामिनाची प्रक्रिया आज मुंबई सत्र न्यायालयात पूर्ण केली जाईल. विशेष कोर्टानं रिलीज ऑर्डर दिल्यानंतर मलिकांच्या सुटकेचे आदेश जारी होणर आहेत. 

Continues below advertisement

किडनीच्या आजाराने त्रस्त असलेले नवाब मलिक हे गेल्या वर्षभरापासून कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयात उपचार घेत आहेत. गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने 23 फेब्रुवारी 2022 ला अटक केली होती.नवाब मलिकांना 11 ऑगस्टला जामीन मंजूर झाला आहे.  जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जाणून घेऊया नवाब मलिकांच्या जामीनाच्या प्रक्रिया कशी असणार आहे. 

 नवाब मलिक यांची जामीन प्रक्रिया कशी असेल?

  •  सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत  सत्र न्यायालय, मुंबई येथे दाखल करावी लागेल.
  • त्या करता Taken on Todays बोर्ड चा अर्ज करावा लागतो, कोर्ट असे अर्ज तात्काळ स्वीकारतात
  •  सत्र न्यायालय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सत्र न्यायालतील रेजिस्ट्री विभागाला कोर्टातील File पाठवणार
  •  त्यानुसार रेजिस्ट्री विभाग जमिनाचे पैसे भरून / जामीनदारच्या कागदोपत्री तपासणी करून सुटकेचा 'Memo' मुंबई मध्यवर्ती कारागृहास देणार
  • हा  Memo  नवाब मलिकांचे वकील हातोहत घेऊन जेल अधिकारी यांना देणार 
  •  कारण डब्यात टाकून उशीर होईल आणि नवाब  मलिक सध्या रुग्णालयात आहेत.
  •  Memo मिळाल्यावर जेल अधिकारी आपली कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करणार
  •  रुग्णालयात उपस्थिती असलेल्या जेल पोलीसला फोन किंवा  स्वतः जाऊन कळवणार.
  • त्यानंतर  नवाब मलिक रुग्णालयातून थेट घरी जाणार

थोरले पवार की, धाकटे पवार? नवाब मलिक कोणाची साथ देणार? 

शिवसेनेतील फुटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली. अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडत भाजप आणि शिंदे गट यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले. एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट. अशातच आता नवाब मलिकांना जामीन मिळाल्यानंतर ते कोणाची साथ देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Continues below advertisement

हे ही वाचा :

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर; काय असतील अटी-शर्ती?