Navneet Rana vs Shivsena Live Updates : शिवसैनिकांच्या हल्ल्यात आपण जखमी झालो असा किरीट सोमय्यांचा आरोप

Navneet Rana vs Shivsena Live Updates : अमरावतीत शिवसैनिकांना गुंगारा देत राणा दाम्पत्य आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. तर मातोश्रीवर या आणि महाप्रसाद घेऊन जा असे शिवसैनिकांनी आव्हान दिले आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Apr 2022 11:47 PM

पार्श्वभूमी

Navneet Rana vs Shivsena Live Updates : राणा दाम्पत्याला मुंबईत जाऊ देणार नाही, असा निर्धार शिवसेनेने केला होता. मात्र तरीही अमरावतीमधील अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मुंबईत...More

ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ ; भाजप नेते आशिष शेलार यांचा इशारा  

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला प्राणघातक हल्ला आहे. अशा प्रकारे राज्य चालवणे अपेक्षित नाही. त्यामुळे ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ अशा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.