मुंबई: राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर 153 अ हे कलम लावण्यात आलं आहे. उद्या राणा दाम्पत्याला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. 


राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर आता उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्यावर 153 अ हे कलम लावण्यात आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणे, धर्म, वंश आणि भाषेच्या आधारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि समाजाची शांतता भंग करणे असे आरोप या कलमांतर्गत करण्यात आले आहेत.


एखादं प्रक्षोभक वक्तव्य करुन जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण केलं जात असेल हे कलम लावलं जातं. या गुन्ह्यामध्ये पोलिसांना जामीन देण्याचा अधिकार नसल्याने आरोपीला न्यायालयासमोर हजर करावं लागतं. पोलीस कस्टडी हवी असल्यास तशी मागणी पोलीस करु शकतात. 


दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार यांनी संजय राऊत यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच अनिल परब यांच्याविरोधात राणा दाम्पत्याने तक्रार दाखल केली आहे. तसेच अज्ञात अशा 500 ते 600 शिवसैनिकांविरोधातही त्यांनी तक्रार दाखल केली आहे. मारहाण करुन हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी अॅम्ब्युलन्स आणली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -


 


ABP Majha