नवी मुंबई : नवी मुंबईत पार पडलेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत गणेश नाईकांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या मदतीने पालिकेच्या स्थायी समितीवर शिवसेनेचे शिवराम पाटील निवडून आले आहेत.

 

शिवराम पाटील यांनी अवघ्या एका मताच्या फरकानं राष्ट्रवादीच्या जे. डी. सुतार यांचा पराभव केला आहे. जे. डी. सुतार यांना सात तर शिवराम पाटील यांना आठ मतं मिळाली आहेत. काँग्रसेच्या सदस्य मीरा पाटील यांनी शिवसेनेला मत दिल्यानंच सेनेला हा विजय मिळवता आला.

 

महापालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र सत्तेत आहेत. मात्र आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने शिवसेनेच्या पारड्यात मत टाकल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.