जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना केक भरविल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजपा आमदाराला चेक भरविल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. 


राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना भुसावळ येथील भाजप आमदार संजय सावकारे हे त्यांचे कट्टर समर्थक राहिले होते. एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेल्या नंतरही खडसे आणि संजय सावकारे यांचे व्यक्तिगत संबंध आजही कायम असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले आहे. 


खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावळी अनेकांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. यावेळी संजय सावकारे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशा संदर्भातील चर्चा नेहमीच होताना दिसून आल्या आहेत. 
 
त्यातच आता पुन्हा काल भुसावळ येथे झालेल्या सावकारे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी आमदार संजय सावकारे यांना केक भरविलाल्याने सावकारे  राष्ट्रवादीमध्ये जाणार का? अशा प्रकारचे तर्क वितर्क लावले जात आहेत.


आपल्या वाढदिवसानिमित्त भुसावळ येथे आयोजित कार्यक्रमात संजय सावकारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी सावकारे हे गाणे गाऊन आणि नृत्य करीत आनंद उत्सव साजरा करीत असल्याचे पाहायला मिळाले. 


एकनाथ खडसे यांनी आपल्याला केक खाऊ घातला. या विषयावर संजय सावकारे यांनी म्हटले आहे की, "वाढदिवसाचा कार्यक्रम माझ्या मित्रांनी आयोजित केला होता. त्यात सर्व पक्षीय लोकांना बोलवण्यात आले होते. त्यामुळे एकनाथ खडसेसुद्धा आले होते. खडसे राष्ट्रवादीमध्ये गेले असले तरी त्यांच्या सोबतचे कौटुंबिक संबंध आजही कायम आहेत आणि त्याच भावनेतून ते आले आहेत. त्याला राजकीय रंग द्यायला नको. आम्हीही इतर पक्षाच्या लोकांच्याकडे लग्न समारंभ, वाढदिवसाच्या निमित्ताने जात असतो. त्यात राजकारण म्हणून पाहायला नको." 


दरम्यान, या प्रकरणी एकनाथ खडसे यांची प्रतिक्रया मिळू शकली नाही. परंतु, राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Indian Parliament attack : कॉलर पकडून जवान जीतराम यांनी झाडल्या होत्या दहशतवाद्यांवर गोळ्या  


Matheran Crime : अखेर 'त्या' महिलेच्या मृत्यूचं गूढ उलगडलं; पतीनंच हत्या केल्याचा संशय