उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर नाशिक झेडपीत शिवसेना-राष्ट्रवादी युती?
एबीपी माझा वेब टीम | 13 Mar 2017 03:46 PM (IST)
नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पवित्र्यामुळे जिल्हा परिषदेतलं राजकारण चर्चेत आलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला दूर ठेवून नाशकात शिवसेना राष्ट्रवादीच्या मदतीने जिल्हा परिषद अध्यक्ष बसवण्याची चिन्हं आहेत. जिल्हा पातळीवर भाजप वगळता शक्य त्या पक्षाचा झेडपी अध्यक्ष बसवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. संख्याबळाचा विचार केला तर नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना 25 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र राष्ट्रवादी किंवा भाजपशी युती केल्याशिवाय त्यांना सत्ता स्थापन करता येणार नाही.