नाशिक : नाशिकच्या नांदूर-मध्यमेश्वर धरणावर स्टंटबाजी करणाऱ्या एका तरुणाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जीवावर बेतणारी अशी स्टंटबाजी काळजाचा थरकाप उडवणारी आहे.


 

ही घटना चार दिवसांपूर्वीची आहे. या धरणातून जायकवाडीसाठी एक ते सव्वा लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असताना तरुणाचे पराक्रम सुरु होते.

 

महत्त्वाचं म्हणजे यावेळी तिथे सुरक्षारक्षक नव्हता. त्यामुळे तरुण दरवाजापर्यंत पोहोचला. तरुण शिडीवर चढला आणि करामतीचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर ही माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली.

 

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाचे प्रताप समोर आले. मात्र हा तरुण कोण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

 

पाहा व्हिडीओ