औरंगाबादः जायकवाडी धरण 2008 सालापासून एकदाही पूर्ण क्षमतेनं भरलं नव्हतं. मात्र या घडीला 50 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद खंडपीठाने गेल्या काही महिन्यांपासून मद्य कारखाने आणि उद्योगांसाठी केलेली पाणीकपात मागे घेतली आहे.


 

 

जिवंत पाणीसाठा संपून जायकवाडी यंदा मार्चच्या सुरुवातीलाच मृतसाठ्यात गेलं होतं. मात्र नाशिक, नगर पट्टयात झालेल्या पावसामुळं जायकवाडीतला उपयुक्त जलसाठा आता 47 टक्क्यांवर पोहोचला आहे. औरंगाबादमध्ये नागरिकांना चौथ्या दिवशी पाणी पुरवठा केला जातो. याबाबतही प्रशासन काही निर्णय घेईल, अशी आशा आहे.

 

 

औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील 12 जिल्ह्यांमधल्या मद्य उद्योग आणि इतर व्यवसायांना ही पाणी कपात लागू होती. खंडपीठाने ती कपात आता मागे घेतली आहे. मराठवाड्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी जायकवाडीतल्या या साठ्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.