सर्जिकल स्ट्राईकची जाहीर वाच्यता करणं चुकीचं: सुशीलकुमार शिंदे
एबीपी माझा वेब टीम | 14 Oct 2016 10:32 AM (IST)
मुंबई: भारतीय लष्कराकडून पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारवर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं हल्लाबोल करायला सुरूवात केली आहे. यूपीएच्या काळात देखील सर्जिकल स्ट्राईक झाल्याची माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार यांनी दिली आहे. तसंच सर्जिकल स्ट्राईकची जाहीर वाच्यता करणं चुकीचं असल्याचं सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं आहे. सुशीलकुमार शिंदेंप्रमाणेच शरद पवारांनी देखील सर्जिकल स्टाईलवरून मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. सर्जिकल स्ट्राईकशिवाय बांग्लादेशची निर्मिती कशी झाली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.