नाशिकमध्ये कुऱ्हाडीचे वार करुन एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 31 May 2017 09:55 AM (IST)
नाशिक : नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली. दिंडोरी कोकणगाव खुर्द गावात ही खळबळजनक घटना घडली. मंगळवार (30 मे) रोजी रात्री 8 ते 10 च्या सुमारास तिघांची हत्या झाली. एक टोळकं रात्रीच्या सुमारास शेळके कुटुंबाच्या शेतातील घरात घुसलं. त्यानंतर त्यांनी कुऱ्हाडीचे वार करुन शेळके कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा अशा तिघांचा खून केला. त्यानंतर तिथून पोबारा केला. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेनंतर गावात तणावपू्र्ण वातावरण आहे.