नाशकात लग्नातून वधूचे दागिने चोरणारा 'बंटी' गजाआड
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 05 Mar 2017 01:14 PM (IST)
नाशिक : लग्नासारखे सोहळे सुरु असताना मंगल कार्यालयातून वधूचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी राजेंद्र जाधवला नाशकातील म्हसरुळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 1 मार्च 2017 रोजी नाशिकमधील मेरी रोडवर असलेल्या औदुंबर लॉन्समध्ये विवाहसोहळा होता. लग्नाच्या दिवशी वधूच्या बॅगमधून 1 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता औदुंबर लॉन्स मधील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु असताना भद्रकाली परिसरातून राजेंद्र जाधवला पोलिसांनी केली अटक केली. आरोपीने 2014 साली अशाच प्रकारे पंचवटी परिसरात चोरी केल्याचीही माहिती आहे.