नांदेड : ABP माझा च्या बातमीची केंद्र शासन आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दखल घेत नांदेड जिल्ह्यातील भोसी पॅटर्नची केंद्र सरकार व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रशंसा करणयात आली आहे. भोसी गावाने कोरोना काळात राबलेल्या आरोग्य यंत्रणेचे  केंद्र सरकारने कौतुक केले आहे. 


कोरोना महामारीत ग्रामीण भागात चाचण्या किंवा इतर आवश्यक सुविधा मोठ्या कष्टाने उपलब्ध होत असताना नांदेड जिल्ह्यातील भोसी खेड्याने संपूर्ण गाव कोरोना हॉटस्पॉट झाल्यानंतर या  महामारीला धैर्याने तोंड दिले. त्याबद्दल केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता प्रशंसा केली आहे. यात गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राने डॉक्टर, आशा ताई , जिल्हा परिषद सदस्य, अंगणवाडी सेविका यांच्या समन्वयातून गाव कोरोना मुक्त केल्याचा विशेष उलल्लेख करून कौतुक करण्यात आलं आहे. 


ग्रामीण भागात असलेल्या आव्हानावरून इशारा दिलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देखील याविषयीची माहिती दिली. ते म्हणाले, की ग्रामीण भागात लोकांमध्ये कोविड बद्दल जागरूकता निर्माण करणे, पंचायत राज व्यवस्था कडून सहकार्य मिळवणे हे सारे प्रशंसनीय आहे.


कोरोनामुळे विड्याचा रंग फिका, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान


जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी केलेल्या कमालीच्या परिणामकारक  कामाची सरकारने गुरुवारी अधिकृतपणे त्याची नोंद घेयलीय. सहा हजार लोकसंख्या असणाऱ्या भोसी गावात आज दोन महिण्यापिर्वी लग्न समारंभाच्या कार्यक्रमातून कोरोनाचा शिरकाव झाला आणि गावातील तब्बल 119 नागरिक कोरोना बाधीत होऊन गाव कोरोना हॉटस्पॉट ठरले.


असा घातला कोरोनाला आळा... 


गावातील वाढती कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख यांनी गावात कोविड च्या चाचण्या घेण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या समन्वयातून आरोग्य शिबीर घेण्यास पुढाकार घेतला. गावात रॅपिड अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्यातुन 119 कोविडबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या मदतीने कोविडबाधित रुग्णांना गावात आयसोलेट न करता शेतात आयसोलेट केले.  त्यांना वेळेवर औषध उपचार देऊन गाव कोरोना मुक्त केले. केंद्र सरकारने त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन विशेष कौतुक केले. तर जिल्ह्यातील प्रत्येक गावाने भोसी गावच्या आदर्शवत पॅटर्नचे अनुकरण करात भोसी च्या या कार्याचे मीसुद्धा अभिनंदन करतो असे उदगार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले.