नाशिक: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून आवश्यकता असल्यास निश्चित केलेली रक्कम भरून याद्या घेता येणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी दिली आहे.


आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे मतदार याद्या ऑनलाईन  प्रसिद्ध करणे शक्य न झाल्याने शहरातील सर्व सहा विभागांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज सर्व विभागातील याद्या महापालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 


दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या https://nmc.gov.in/home/getfrontpage/188/133/M या संकेतस्थळावर या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून या याद्यांवर एक जुलैपर्यंत त्याच्यावर हरकती दाखल होणार असून 9 जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. तसेच सदर यादी मध्ये आपले नाव पाहण्‍यासाठी प्रभागनिहाय याद्यांपैकी आपले प्रभागाची यादी डाउनलोड करणे आवश्यक असणार आहे. मतदार यादीबाबत काही हरकत/सुचना असल्यास तर दिनांक 23 जून 2022 ते 1 जुलै 2022 रोजी कार्यालयीन वेळेत मुख्य निवडणूक कार्यालय, महानगरपालिका, सर्व विभागीय कार्यालय येेथे दाखल करता येणार आहेत.


विभागनिहाय प्रभाग क्रमांक असे
शहरात पंचवटी प्रभाग एक ते आठ, नाशिक पश्चिम 9, 16 आणि प्रभाग 18, सातपूर प्रभाग 10 ते 15, नाशिक पूर्व 17, 19 ते 21, 27 ते 29, 39, 40 नाशिकरोड 22 ते 26 आणि 41 ते 43, नवीन नाशिक विभाग 30 ते 38 आणि प्रभाग 44 याप्रमाणे प्रभागांच्या प्रारुप मतदार याद्या तेथील विभागीय कार्यालयात प्रसिध्द करण्यात आल्या. 


दोन लाख मतदार वाढले!
प्रारुप मतदार याद्यावर उद्यापासून हरकती नोंदविता येणार आहे. येत्या एक जुलैपर्यत मतदार याद्यावर हरकती नोंदविता येणार आहे. हरकतीवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिध्द होईल. दरम्यान आजच्या यादीनुसार साधारण 12 लाख मतदार आहे. गेल्या पंचवार्षीक निवडणूकीच्या तुलनेत साधारण दोन लाख मतदार वाढले आहे.