Raju Shetti : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. 


मात्र, हे अनुदान देत असताना लावलेल्या अटींवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पोलखोल केली आहे. त्यामुळे 13 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. 


राजू शेट्टी पुढे म्हणाले की, या सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्याना 50 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे, पण ही सरळ सरळ अनेक शेतकऱ्यांची  फसवणूक आहे. सहकार आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात अनेक अटी घालून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना महापुरात मदत मिळाली आहे, त्यांना हे अनुदान मिळणार नाही अस हे परिपत्रक सांगत आहे. नियमित कर्ज भरणारे 95 टक्के शेतकरी हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, पण हेच शेतकरी या मध्ये पात्र होताना दिसत नसल्याचे ते म्हणाले. 


राजू शेट्टी काय म्हणाले ?



  • ज्यांना 2019 ला नुकसान झालं म्हणून लाभ मिळाला होता त्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान न मिळण्याची आत घालण्यात आली आहे. 

  • ऊस शेती ही 15 ते 18 महिन्याच पीक आहे. शासनाचा नियम असा आहे की सलग तीन वर्षे कर्ज काढल्यास या योजनेला पात्र राहील असे निकष आहेत मग 15 ते 18 महिने ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबत कसा नियम धरायचा?

  • कोल्हापूर जिल्ह्यात 953 कोटी रुपये  शेतकऱ्यांना मिळतात पण सरकारच्या नियमानुसार फक्त 104 कोटी मिळणार आहेत

  • यामध्ये सरकारच्या नियमानुसार फक्त 10 टक्के लोकांना याचा लाभ मिळणार मग शेतकऱ्यांना तुम्ही कसले अनुदान दिला. जिल्ह्यात 1 लाख 42 हजार पैकी फक्त 17 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे

  • बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार का?

  • शिरोळ तालुक्यातील काही सेवा सोसायटीमध्ये मी विचारणा केली किती लोकांना लाभ मिळणार तर सोसायटीच्या माहितीनुसार त्यांनी फक्त एक सोसायटीत 10 ते 12 लोक लाभार्थी होतील, असे सांगतिले. 

  • मागील सरकारने कर्जमाफी देताना 16 वेळा त्यांनी जीआरमध्ये बदल केला, पण त्यांनी त्यात दुरुस्त्या करून शेतकऱ्यांना जे सांगितलं होतं ते कर्ज दिल, पण या सरकारमध्ये बरेच मंत्री जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांना सहकारातील बरीच माहिती आहे. त्यांनी या अटी लावताना शेतकरी सध्या पेचात आहे याबाबत माहिती नाही का?

  • आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हे नेहमी सांगायचं आम्ही कोणत्याही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही मोठं आंदोलन केले त्यामध्ये त्यांनी सांगितले आम्ही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू पण यांनी शेतकऱ्यांची कोणतीही पूर्तता केली नाही.