नाशिक : एकतर्फी प्रेमातून एखादा प्रेमवीर किंवा प्रेयसी काय करतील, याचा नेम नाही. नाशकात एका प्रेमवेड्याने चक्क महाविद्यालयात जाऊन प्राध्यापिकेला लग्नाची मागणी घातली आणि कुंकू लावलं. लग्नाच्या बेडीत अडकण्याची स्वप्न पाहणाऱ्या योगेश जावळे या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नाशकातील केटीएचएम महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या युवतीवर योगेशचं एकतर्फी प्रेम होतं. याच प्रकारातून त्याने कॉलेजमध्ये जात संबंधित प्राध्यापिकेची केबिन गाठली. 'मला नोकरी लागली आहे, माझ्याशी लग्न कर' असं म्हणत त्याने तिला लग्नाची मागणी घातली आणि कुंकू लावण्याचा प्रयत्न केला.
महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांना वेळीच ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी योगेशला मज्जाव केला. तेव्हा त्याने कॉलेजमधील इतरांनाही धक्काबुक्की केली.
या प्रकरणी योगेश जावळेला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात नाशकातील सरकारवाडा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेशची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मात्र या प्रकारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि प्राध्यापिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कॉलेजमध्ये घुसून प्राध्यापिकेला कुंकू लावणारा प्रेमवीर अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jan 2019 08:41 PM (IST)
नाशकातील केटीएचएम महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या युवतीवर योगेशचं एकतर्फी प्रेम होतं. 'मला नोकरी लागली आहे, माझ्याशी लग्न कर' असं म्हणत त्याने कॉलेजमध्ये तिला लग्नाची मागणी घातली आणि कुंकू लावण्याचा प्रयत्न केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -