नाशिक : 'मुलं रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात, प्रामाणिकपणे परीक्षा देतात. या घटनांमुळे अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे. ती परीक्षा ज्यांनी घेतली, एजन्सीवर देखील कारवाई झाली पाहिजे. एक हजार रुपये तुम्ही प्रति विद्यार्थ्यांच्या मागे गोळा करतात, तर त्या एक हजार रुपयांमध्ये तुम्ही फेअर आणि ट्रान्सपरंट परीक्षा घेऊ शकत नसाल, तर आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे सणसणीत टीका आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी केली आहे. 


तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटीचा (Talathi Exam 2023) आरोप असलेला मुख्य आरोपी गणेश गुसिंगे (ganesh Gusinge) हा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत पास (DMER Exam) झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे सर्वच स्तरावरून राज्य सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. या भरतीच्या परीक्षेमध्ये गणेश गुसिंगेला 138 गुण प्राप्त झाले असून त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारवर व संबंधित एजन्सीवर सवाल उपस्थित करत सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? असा सवाल सरकारला विचारला आहे. 


सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यावेळी म्हणाले की, अतिशय धक्कादायक बाब समोर आली असून नाशिकमधील (Nashik) तलाठी भरती परीक्षेत हायटेक पद्धतीने कॉपी पुरवत असलेला आरोपी गणेश गुसिंगे हा वैदकीय शिक्षण विभागाने घेतलेल्या डीएमईआरच्या परीक्षेत मेरिटमध्ये उत्तीर्ण झाला आहे. 138 मार्क घेऊनउत्तीर्ण झाला आहे. परवाच पकडलेला आरोपी जर एखाद्या दुसऱ्या परीक्षेत एवढ्या मार्कानी उत्तीर्ण होत असेल तर ही डीएमईआरची परीक्षा देखील घोटाळ्यांमध्येच झालेली आहे. असं माझं ठाम मत आहे. हि परीक्षा रद्द करून पुन्हा घेतली पाहिजे. जे मुलं रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात, प्रामाणिकपणे परीक्षा देतात. या घटनांमुळे अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे. ती परीक्षा ज्यांनी घेतली, एजन्सीवर देखील कारवाई झाली पाहिजे, राज्यामध्ये तलाठीची परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यावर होत आहे,  त्यावर आता कशा पद्धतीने उपाय योजना सरकार करणार, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. एक हजार रुपये तुम्ही प्रति विद्यार्थ्यांच्या मागे गोळा करतात, तर त्या एक हजार रुपयांमध्ये जर तुम्ही फेअर आणि ट्रान्सपरंट परीक्षा घेऊ शकत नसाल, तर मला असं वाटतं की आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.


सरकारकडून हायटेक उपाययोजनांची गरज  


सरकारने यापूर्वी देखील परीक्षा घेतल्या असून एमपीएससीच्या (MPSC) माध्यमातून परीक्षा घेतल्या, तेव्हाही अशा पद्धतीचे आरोप झाले. खाजगी संस्था घेतल्या, असे आरोप झाले. टीसीएससारखी (TCS) खाजगी संस्था आहे. मात्र तिथंही हायटेक कॉपीचे प्रकार समोर येत आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस सारख्या संस्थेने देखील परीक्षा घेतल्या. त्याच्यातही हायटेक प्रकारची कॉपी (Hightech Copy) होते. आता जर कॉपी जर अशा पद्धतीने हायटेक होत असेल तर त्याच्यात 100 टक्के ती एजन्सी दोषी आहे का? तर नाही. परंतु तशी कॉपी होऊ नये, यासाठी जी उपाययोजना करायला पाहिजे, एखाद्या हायटेक पद्धतीने कॉपी होत असेल तर त्याला हायटेक पद्धतीनेच उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल, यासाठी जर आपण चांगले एजन्सी सरकारच्या माध्यमातून घेत असतो. त्याच्यासाठी जर हजार रुपये प्रति परीक्षा, प्रति विद्यार्थी आपण घेत आहोत. म्हणूनच या परीक्षा अतिशय स्पेअर आणि ट्रान्सपरंट पद्धतीने सरकारने तातडीने पावलं उचलणं आवश्यक आहे. अन्यथा या स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकर भरतीच्या ज्या परीक्षा याच्यावरचा युवकांचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही



इतर महत्वाची बातमी : 


Talathi Exam: तलाठी परीक्षेचा ज्याने पेपर फोडला तो मुख्य आरोपीच होणार परीक्षा पास; गणेश गुसिंगेला 138 गुण, परीक्षा आयोजनावर प्रश्नचिन्ह