Nashik Nana Patole : देशातल्या सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपने नाशिक (Nashik) पदवीधरच्या निवडणुकीत ( Nashik graduate constituency MLC Election) उमेदवार का दिला नाही. कोणत्याच उमेदवाराला एबी फॉर्मही दिला नाही. असं का? एवढी मोठी निवडणुकीत असताना भाजपची (BJP) माघार का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ते यावेळी म्हणाले कि, भाजपने आमचा हा उमेदवार आहे, हे जाहीर का केले नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचे लोक राहत नाहीत का? अनेक लोक फॉर्म भरतात, भाजपने एबी फॉर्म न देणे, उमेदवार जाहीर न करणे, हे कशाचे द्योतक आहे असा सवाल त्यांनी केला. नाशिक पदवीधर निवडणुकीत उमेदवार न देता भाजप का लपते आहे. उमेदवार न देणे  यात भाजपचं कोणतं नाक कापलेले आहे? अशी घणाघाती नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे. 


नाशिक पदवीधर निवडणूक (Nashik Graduate Constituency) ही काँग्रेसची जागा आहे. मात्र या ठिकाणी पक्षाला धोका मिळाला. दोन एबी फॉर्म देऊनही सगळं गणित फिरलं. मात्र माझा एक सर्वाना सवाल आहे कि, या मतदारसंघात भाजपने का उमेदवार दिला नाही. देशातील सगळ्यात मोठा पक्ष असलेला भाजपने यावेळी माघारी का घेतली. हे सगळं कटकारस्थान भाजपकडून रचणं चालू आहे. दुसऱ्यांची घर फोडायला भाजपला आवडतं, त्यानंतर ते हसतात. पण ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल. त्या दिवशी त्यांना कळेल, आमचं घर फुटलेले आहे. आम्हाला त्याचं दुःख आहे, मात्र जेव्हा त्यांचं घर फुटेल तेव्हा त्यांना कळेल आणि ते लवकरच होणार आहे. शिशुपालाचे 100 पाप भरले आहेत आणि शंभर पाप भरल्यानंतर त्याचा घडा फुटला. त्याचप्रमाणे भाजपच्या पापाचा घडा भरला आहे. जनता लवकरच हा पापाचा घडा फोडणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले म्हणाले, नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. सर्वजण जोमाने काम करत आहेत. त्यामुळे शुभांगी पाटील जिंकतील. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणणे हे आमचे दायित्व आहे. सत्यजित तांबे यांचा विषय क्लोज केला आहे. त्यामुळे त्यावर अधिक चर्चा करणे सोयीस्कर नाही. तर दुसरीकडे माध्यमे तांबे प्रश्नावर सातत्याने प्रश्न विचारत आहेत मात्र भाजपला कुणी प्रश्न विचारला का? तुमचा उमेदवार का नाही? तुम्ही आम्हालाच खूप प्रश्न विचारतो. देशातील सगळ्यात मोठी पार्टी भाजप आहे, नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपला उमेदवार का नाही? भाजपला उमेदवार का नाही मिळाला नाही. या नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते नाहीत का? असा सवाल करत नाना पटोले यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले.