Kasba Bypoll Elelction : पुण्यात कसबा (Kasba peth) आणि चिंचवडच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या. येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे सध्या या जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार याच्या शहरात चर्चा सुरु आहेत. त्यात कसबा मतदार संघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहेत. त्यातच कसबा विधानसभेची जागा महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (shiv sena) पक्षाला द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे. 


दोन दिवसात सचिन आहिर आणि संजय राऊत यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यात यासंदर्भात निर्णय होणार आहे. त्यानुसार पक्षाची भूमिका स्पष्ट होणार आहे. मात्र ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली तर कसब्यात शिवसेनेला फायदा होईल, असंही ते म्हणाले. शिवाय शिंदे गटाविरोधात असलेल्या रागाचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो याचा विचार करावा, असाही सल्ला त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे. 


2019 ला विशाल धनवडे यांनी युती असल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी ते पराभूत झाले होते. यावेळी मात्र विशाल धनवडे निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं बोलून दाखवलं आहे. कसब्याच्या संधीचा शिवसेनेने फायदा उचलायला हवा. त्यामुळे कसब्यात शिवसेनेने जागा लढवायलाच हवी, असं मला वाटतं. यासंदर्भात पक्षाचे पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील. त्यांचाय निर्णय अंतिम असेल. तो निर्णय सगळ्या शिवसैनिकांना मानावा लागेल, असंही ते म्हणाले, 


कसबा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे आता काही प्रमाणात स्पष्ठ झालं आहे. दोन दिवसांपूर्वी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनीदेखील या संदर्भात शाशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघात बिनविरोध होणार नाही आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे कसब्यातून लढायला तयार असल्याचं वारंवार पक्षातील नेत्यांना सांगत आहेत. त्यामुळे या मतदार संघासाठी त्यांच्यासोबतच अनेक नावं चर्चेत आहे. 


टिळकांच्या घरात उमेदवारी मिळणार का?


मुक्ता टिळकांच्या निधनानंतर या जागेसाठी उमेदवारी मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक आणि त्यांचा मुलगा कुणाल टिळक यांच्यापैकी एकला उमेदवारी मिळू शकते. मात्र शैलेश टिळक राजकारणात फार सक्रिय नाहीत. त्यामुळे कुणाल टिळकांच्या नावाची चर्चा आहे. शिवाय कुणाल टिळक मागील काही वर्षांपासून भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहे. मुक्ता टिळक आजारी असताना त्या मतदार संघाचं कामही कुणाल टिळकांनी केलं आहे.