Dilip Walse Patil on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision 2023) कार्यक्रमात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi) काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी माझाच्या मंचावरून केला.  फडणवीसांचा हा दावा तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील फेटाळला आहे. 


एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं. त्यात अगोदरच्या सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि ठाकरे सरकारबद्दल बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. एवढंच नाही तर तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना हे टार्गेट दिलं होतं, असंही यावेळी बोलताना फडणवीस यांनी सांगितलं. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी फडणवीसांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. 


पाहा व्हिडीओ : Devendra Fadnavis : मविआ सरकारचा मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट



तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांनी केलेले आरोप फेटाळून लावले. तसेच, फडणवीसांना अटक करण्याचा कुठलाही प्रयत्न महाविकास आघाडीनं केला नाही, असं दिलीप वळसे पाटलांनी स्पष्ट केलं. "देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याचा कुठलाही प्रयत्न किंवा अशी कुठलीही योजना महाविकास आघाडी सरकारमध्ये नव्हती. ते काय बोललेत मी ऐकलं नाही. परंतु, असा कुठलाही प्रयत्न किंवा अशी कुठलीही योजना महाविकास आघाडी सरकारमध्ये नव्हती. ते त्यांच्या माहितीच्या आधारावर बोलले असतील. मात्र, मला जी माहिती आहे, राज्य सरकारनं असं काहीही केलेलं नाही.", असं दिलीप वळसे पाटील बोलताना म्हणाले. 


पाहा व्हिडीओ : Dilip Walse Patil : फडणवीस म्हणाले, मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, माजी गृहमंत्र्यांचं उत्तर



एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी काय म्हटलं? 


एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात प्रश्न विचारला. त्यावेळी उत्तर देताना फडणवीसांनी हा गौप्यस्फोट केला. 


प्रश्न :महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर, राजकीय वैर आणि खासगी वैर असं काही नव्हतं. राजकीय वैर वेगळं आणि खासगी मैत्री वेगळी असायची. उद्धव ठाकरे आणि तुमची खास मैत्री होती. पण गेल्या अडीच वर्षात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून कटुता खूप वाढली आणि राजकीय वैर खासगी वैरात रुपांतरीत झालं, असं वाटतंय...


उत्तर : "मी राजकीय वैर ठेवत नाही. आमचं सरकार राजकीय वैरानं वाढणारही नाही. पण या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या, मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आलं होतं. अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं की, ज्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. पण कुठल्याही परिस्थितीत मला अडकवा आणि मला जेलमध्ये टाका, असे आदेश महाविकास आघाडी सरकारमधील होते. हेदेखील सत्य आहे. पोलीस प्रशासनातील कोणालाही विचारलं, तर तेदेखील हेच सांगतील."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Majha Maharashtra Majha Vision :ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट