Nashik Accident Update: नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ट्रकमधील लोखंडी सळ्या अंगात घुसून 5 जण जागीच ठार तर 13 जण गंभीर जखमी झाले होते. आता या अपघातात मृतांची संख्या वाढली असून जखमींचा रुग्णालयात मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 7 वर पोहेाचली आहे. लोखंडी सळ्यांची एवढ्या धोकादायकपणे वाहतूक करणारा पुरवठादार गोत्यात आला असून या भीषण अपघाताला कारणीभूत ठरणारा टेम्पो चालक, मालक आणि सळईचा पुरवठादार अशा तिघांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील दोघांना अटक झाली असून टेम्पोचालक फरार आहे.
नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात रविवारी रात्री भीषण (Nashik Accident News) अपघात झाला. एक पिकअप ट्रक लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. यानंतर मागून येणाऱ्या वाहनाने पिकअपला जोरदार धडक दिल्याने पिकअप दोन्ही वाहनांमध्ये चिरडला गेला. यावेळी ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअपच्या काचा फोडून आतमध्ये शिरल्या आणि तरुण मुलांच्या शरीरात घुसल्या. यात जागीच 5 जण ठार झाले असून 13 जखमी होते. यात जखमी 2 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूंचा आकडा 7 वर गेलाय. या घटनेने आता नाशिक पोलिसांना खडबडून जाग आली आहे.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
अपघातातील मृतांच्या वारशांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमींच्या औषधेापचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी सांगितलं.नाशिकमधील झालेल्या भीषण अपघातात ट्रकच्या बाहेर लोखंडी सळ्या होत्या. या सळ्या तरुणांच्या शरीरात घुसल्याने पाच जणांचा जीव गेला. माल वाहतुकीच्या वाहनांना नियम असतात. मात्र हे नियम रस्त्यांवर फिरणाऱ्या वाहनांना लागू नाहीत का? सर्वसामान्यांवर केली जाणारी कारवाई मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर देखील तितक्याच प्रभावीपणे का लागू होत नाही? लोखंडी सळ्या अथवा एखादी कोणताही माल अवजड वाहनातून नेतांना एखादा कपडा किंवा वाहनाला रिफ्लेक्टर स्टेडियम का लावले जात नाही? आणि अशा नियमबाह्य वाहन चालक आणि संबंधितांवर पोलीस तात्काळ कारवाई का करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न आता या अपघातानंतर उपस्थित होत आहे. या अनुषंगाने नाशिक पोलसांनी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: