नाशिकला डेंग्यूचा विळखा, 555 संशयित, 185 जणांना लागण
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2016 12:32 PM (IST)
नाशिक: नाशिक शहरात गेल्या 26 दिवसात डेंग्यूचे तब्बल 555 संशयित रुग्ण आढळलेत, तर तब्बल 185 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अद्याप 90 जणांचे अहवाल येणं बाकी आहे. नाशिकला बसलेल्या डेंग्यूच्या या विळख्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. दरम्यान, राज्यभरात साथीच्या आजारांनी डोकं वर काढल्याचं पहायला मिळतंय. सोबतच राज्यभरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढऴण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचं, तसेच काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय.