नाशिकमधील पिंपळगावच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळ शरद पवारांनी नोटाबंदीपासून ते शेतीपर्यंत सर्वच विषयांवरुन खुमासदार टोलेबाजी केली.
"मोदी गडी बोलायला फार हुशार,
म्हटले माझं बोट धरून राजकारणात आले, हे ऐकून मी मेलोच ना..
असं भाषण देतात, की समोरच्याला वाटतं, आहे बाबा 56 इंचाची छाती आहे"
असं पवार म्हणताच घटनास्थळी एकच हशा पिकला.
यावेळी पवारांनी मोदींची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली. मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावरुन पवारांनी चौफेर टोलेबाजी केली. ही नोटबंदी की नसबंदी ठरते हे येणारा काळ सांगेल, असं पवार म्हणाले.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही सहकारी बँकेत जमलेले 8 हजार 600 कोटी कुणी स्वीकारत नाहीत. संसदेतल्या बँकेतही पैसे नव्हते, 24 हजाराचा चेक दिला तर दहा हजारच मिळाले, असा स्वअनुभव पवारांनी सांगितला.
"56 इंच छातीच्या माणसाने घेतलेल्या निर्णयाने आधी लोक खूश झाले,
मात्र नंतर लायनीत लागले", असं पवार म्हणाले.
त्यांना फासावर लटकवा
बनावट नोटा छापणाऱ्यांना फासावर लटकवा, अशी घणाघाती गर्जना पवारांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी छबू नागरे सध्या बनावट नोटा छापल्याप्रकरणी जेलमध्ये आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, "आमच्यातल्या एका शहान्याने घरातच नोटा छापन्याचा कारखाना टाकला".
भाजप खासदार मोदींना घाबरतात
भाजपा खासदार मोदींना घाबरतात. भाजपा खासदार मला सांगतात त्यांना समजावा, असं पवारांनी सांगितलं.