रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांचं तोंड बघायलाही लोक तयार नाहीत, त्यामुळे त्यांनी प्रचार सोडून द्यावा, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. गर्दीअभावी रद्द झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील सभेवरुन राणेंनी टोमणा लगावला.

अडीच वर्षात जनता तुम्हाला कंटाळली आहे. त्यामुळे प्रचारच करु नका, असं नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे झालेल्या सभेत राणे बोलत होते.

पुण्यातील सदाशिव पेठेत शनिवारी दुपारी आयोजित केलेली मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा गर्दीअभावी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांसारख्या सर्वपक्षीयांनी टीकेचे बाण सोडले होते.

दोन दिवसांपूर्वी कोकणात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली नव्हती, त्यामुळे कोकणात सेना भाजपची छुपी युती असल्याचा दावाही राणे यांनी केला.

संबंधित बातम्या :


सभेला कोणीच नाही, सभा सोडून मुख्यमंत्री रवाना!


मुख्यमंत्र्यांच्या रद्द सभेवरुन शिवसेनेचे तिरकस बाण


मुख्यमंत्र्यांना 'पुणेरी टोमणे', सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस