मुंबई बकाल करणाऱ्यांचा जाहीरनामा बकवास: नारायण राणे
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2017 08:16 PM (IST)
मुंबई: शिवसेनेनं युतीची वाट न पाहता आज आपला वचननामा प्रसिद्ध केला. पण शिवसेनेच्या या वचननाम्यावर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. 'मुंबई बकाल करणाऱ्यांचा जाहीरनामा बकवास आहे.' अशा शब्दात टीका करत नारायण राणेंनी शिवसेनेवर हल्लोबल केला. यावेळी नारायण राणेंनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चेवरही टीका केली. 'शिवसेना आणि भाजपची युती होणार नाही. शिवसेना कार्यकर्त्यांची फसवणूक करत आहे.' असं म्हणत राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला. आज शिवसेननं आपल्या वचननाम्यात डबेवाल्यासाठी भवन बांधणार असल्याचं जाहीर केलं. यावरुनही राणेंनी निशाणा साधला. 'आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा मग डबेवाल्यासाठी भवन बांधा.' दरम्यान, राणेच्या या टीकेला आता शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संबंधित बातम्या: मुंबईकरांसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर