मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर आता त्यांच्या जामीनासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालय आणि रत्नागिरी सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. रितसर अर्ज करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. 


नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान रायगड येथे असताना त्यांना मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्यांच्याविरोधात महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नारायण राणे यांना संगमेश्वर येथून पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता नारायण राणे यांना संगमेश्वरहून महाड येथे नेले जात आहे. तेथे त्यांना महाड न्यायालयात हजर केले जाणार आहे. 


Narayan Rane Arrest : नारायण राणे यांना अटक घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डी यांची टीका


काय म्हणाले होते नारायण राणे?


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या पाचव्या दिवशी यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केला. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद  निर्माण झाला आहे. 


संबंधित बातम्या


केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेत्यांकडूनही समाचार, कोण काय म्हणाले?