मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगानं दिले आहेत. 48 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबईतल्या मालवणी पोलिसांना देण्यात आले आहेत. दिशा सालियनची हत्या झाल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला होता. पोलिसांच्या अहवालानंतरही आणि पोस्टमार्टेम रिपोर्टनंतरही राणेंनी आरोप करुन दिशा सालियनची बदनामी केल्याची तक्रार किशोरी पेडणेकर यांनी केली होती.अखेर राज्य महिला आयोगानं या प्रकरणात लक्ष घातलंय.


सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापकाचे काम केलेल्या दिशा सालियानच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नसून त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे, असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे  केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना 48 तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत.


काय म्हणाले होते नारायण राणे? 


अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. दिशा सालियनचा 8 जूनला बलात्कार करुन हत्या करण्यात आली. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी म्हटलं होतं की, सांगितले आत्महत्या केली. मात्र, तिने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली असल्याचे राणे म्हणाले. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती ? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला.  सुशांतच्या घरातील सावंत नावाचा मुलगा कुठे गेला? तो अद्याप बेपत्ता आहे. तसेच रॉय म्हणायचा मुलगा होता, तो कुठे गेला, तोही अद्याप गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. तसेच दिशा सालियनच्या घरातील वॉचमन कुठे आहे? तो देखील गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. कोण काहीतरी लपवते, हेच यावरुन स्पष्ट होत असल्याचे राणेंनी यावेळी सांगितले. लपवलेल्या गोष्टी बाहेर याव्यात असेही राणे यावेळी म्हणाले.


संबंधित बातम्या : 


केंद्राकडून सूडनाट्य सुरू, क्रियेला प्रतिक्रिया देण्याची मर्यादा पाळावी; जयंत पाटलांचा सेना-भाजपला खोचक सल्ला


Narayan Rane Sindhudurg Bungalow : नारायण राणेंच्या आणखी एका बंगल्यावर कारवाई? सिंधुदुर्गमध्ये समुद्रकिनारी आहे नीलरत्न बंगला


राणेंच्या अधीशवर कारवाई होणार? मुंबईत जुहूमधल्या बंगल्याची पालिकेच्या पथकाकडून पाहणी