मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) सकाळीच नारायण राणे यांचं भाजपमध्ये पुनर्वसन होणार असं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना म्हणाले होते. त्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी नागपूरला रवाना झाले आहेत.


नारायण राणे यांच्या या भेटीमध्ये मंत्रीपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पण ही भेट नागपूरमध्ये नेमकी कुठं होणार याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. राणेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

'राणेंचं पुनर्वसन होणार. ते आमच्यासोबत आहेत, राणेंना आमच्या कोट्यातून घेणार, त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्न नाही', असं फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे आता या भेटीत नेमकी काय चर्चा होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
संबंधित बातम्या :

पुनर्वसन विस्थापितांचं होतं, खडसे प्रस्थापित नेते : फडणवीस