मुंबई : गेल्या दोन वर्षांत राज्यातील तब्बल 5 हजार 846 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक कबुली मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात लेखी उत्तराद्वारे दिली आहे. जानेवारी 2016 ते जून 2016 मध्ये 2881 मुली बेपत्ता झाल्या आहे. तर 1 जानेवारी ते 30 जून 2017 पर्यंत 2965 मुली बेपत्ता झाल्या आहेत.
विशेष म्हणजे बेपत्ता महिलांच्या यादीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतोय. यानंतर बेपत्ता मुलींच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत लेखी उत्तर सादर केलं आहे. राज्यातून मुली बेपत्ता कशा होतात याच वास्तवही ‘एबीपी माझा’नं दाखवलं होतं. यावरुन राज्यात मोठा गदरोळ उडाला होता. आता मुख्यमंत्र्यांच्या कबुलीनंतर ‘माझा’च्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे.
राज्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याबाबत प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर :
- राज्यात 1 जानेवारी ते 30 जून 2017 पर्यंत 2965 मुली बेपत्ता
- जानेवारी 2016 ते जून 2016 मध्ये हेच प्रमाण 2881 होतं.
-राज्यात हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी जुलै 2015 ते जुलै 2017 या कालावधीत चार ऑपरेशन राबवण्यात आली होती
- यामध्ये बेपत्ता बालकांपैकी 2016 मध्ये 1613 आणि 2017 मध्ये 645 बालकांचा शोध घेण्यात आला.
दरम्यान, याआधी राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून देखील एक धक्कादायक माहिती समोर आली होती. महाराष्ट्रातून तब्बल 49 हजार महिला बेपत्ता होत असल्याचं यावेळी समोर आलं होतं.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रातून वर्षभरात तब्बल 49 हजार महिला बेपत्ता
महाराष्ट्रातून दोन वर्षात 5 हजार 846 मुली बेपत्ता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Dec 2017 07:59 PM (IST)
गेल्या दोन वर्षांत राज्यातील तब्बल 5 हजार 846 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक कबुली मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात लेखी उत्तराद्वारे दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -