मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांचा दावा साफ फोल ठरला आहे. कारण एबीपी माझाने दिलेल्या मुख्यमंत्री आणि राणेंच्या भेटीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. तशी दृश्य माझाच्या हाती लागली आहेत.


दोन्ही नेते एकमेकांची भेट झाली नसल्याचा दावा करत होते. मात्र या दृश्यांमुळे त्यांचा दावा फोल ठरला आहे.

अहमदाबादेत मी वैयक्तिक कामासाठी गेलो होतो, असा नारायण राणेंचा दावा साफ फोल ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे एकाच कारमधून भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीला जात असतानाचे दृश्यं माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

पुढच्या सीटवर नितेश, मागच्या सीटवर राणे-मुख्यमंत्री!


खासगी कामासाठी अहमदाबादला जाऊ शकत नाही का असा सवाल करणाऱ्या काँग्रेस नेते नारायण राणेंप्रकरणी नवा गौप्यस्फोट झाला आहे. दस्तुरखुद्द नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत प्रवास करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे याच गाडीत पुढच्या सीटवर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणेही असल्याचं दिसतंय.

‘माझा’च्या हाती लागलेल्या दृष्यांमध्ये नारायण राणे आणि मुख्यमंत्री मागच्या सीटवर बसललेले स्पष्ट दिसतात. तर नितेश राणे पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला पाहायला मिळतात.

त्यामुळे खासगी कामासाठी राणेंना राज्याचे मुख्यमंत्री कशाला सोबत लागतात असा सवाल आता उपस्थित होत आहे.

रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. मात्र काल राणेही अहमदाबादमध्ये होते. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे.



दौरा खासगी राणे

दरम्यान अहमदाबाद विमानतळावर कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या राणे यांनी मुंबईत पोहोचताच, आपला अहमदाबाद दौरा हा खाजगी कामासाठी असल्याचं सांगितलं. खाजगी कामासाठी मी अहमदाबादला जाऊ शकत नाही का? असा प्रतिसवाल राणे यांनी विचारला.

मुख्यमंत्री अमित शहांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी सुमारे एक तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, नारायण राणे काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह हे अहमदाबादेत असतानाच नारायण राणेही अहमदाबादमध्येच असल्याने या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे.

नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास

– 1968 – वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश

– 1968 – शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेत शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी

– 1985 ते 1990- या काळात शिवसेनेचे नगरसेवक त्यानंतर बेस्टचे अध्यक्षपद भूषवले

– 1990-95 – नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर

– 1991 – छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षातील महत्त्व वाढले

– 1990-95 – याच काळात विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेतेपद

– 1996-99 – युतीची सत्ता आल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्रीपदी विराजमान

– 1999 – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड

– 2005 – शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद. मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी शिवसेना सोडली

– 2005 – शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

-2005 – शिवसेना सोडल्यावर काँग्रेसतर्फे मालवणमधून विक्रमी मतांनी विजयी

– 2005 – आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपदी निवड

– 2007 – काँग्रेसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड

– 2009 – विधानसभेनंतर उद्योग मंत्रीपदावर घसरण

– 2014 – लोकसभेला पुत्र निलेश राणे यांच्या पराभावनंतर मंत्रीपदाचा राजीनामा

– 2014 – मुख्यमंत्री पदासाठी झुलवल्याच्या नाराजीतून पुन्हा मंत्रीपदाचा राजीनामा

संबंधित बातम्या

पुढच्या सीटवर नितेश, मागच्या सीटवर राणे-मुख्यमंत्री!


राणेंच्या निर्णयानंतर अनेकांचं आयुष्य घडणार आणि बिघडणार : नितेश राणे

राणे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना, शाह-फडणवीसांशी भेट?


नारायण राणे यांचा राजकीय प्रवास


नारायण राणे पुन्हा शिवसेनेत परतणार?