सोलापूर : माकपचे नेते नरसय्या आडम यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या महिन्यात सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी नरसय्या आडम यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्यासपीठावरुन भाषण केलं होतं.


नरसय्या आडम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितीत भाजपच्या व्यासपीठावर भाषण केलं होतं. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचं कारण देत माकपने त्यांची तीन महिन्यांसाठी सेंट्रल कमिटीतून हकालपट्टी केली आहे.


आडम मास्तर गेल्या महिन्यात भाजपच्या व्यासपीठावर नुसते उपस्थित नव्हते तर त्यांनी पंतप्रधान मोदींची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भरभरुन कौतुक केलं होतं. विडी कामगार व इतर कष्टकरी समाजासाठी त्यांनी हातात घेतलेल्या 30 हजार घरांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं.


आघाडी सरकारच्या काळात दाबून ठेवलेली फाईल भाजप सरकारने मंजूर करुन निधी देखील दिला. त्यामुळेच मोदी सरकारचे कौतुक केलं, असंही आडम मास्तर यांनी स्पष्ट केलं होतं.