Weather Update: गेल्या काही दिवसांपासून आर्द्रता, दमटपणा आणि पावसाला पोषक स्थितीमुळं राज्यातील थंडी जवळपास गायबच झाली होती . गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा थंडीची चाहूल राज्याला (Maharashtra Weather) लागली आहे . देशात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने महाराष्ट्रात चांगलाच गारठा वाढलाय .उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून नागरिक रस्त्यावर ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत . कपाटातून स्वेटर्षाली बाहेर निघाल्या आहेत .येत्या दोन दिवसात तापमान आत आणखी घट होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवलीय .
हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार ,उत्तरेकडील राज्यांमध्ये 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत थंडीची लाट राहणार असल्याचं सांगण्यात आलं . जम्मू काश्मीर , उत्तर प्रदेश , राजस्थान ' मध्य प्रदेश या राज्यांमध्ये थंडीची लाट राहणार असून कोरडे थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत . परिणामी उत्तर व पश्चिम महाराष्ट्र चांगलाच गारठलाय .
येत्या दोन दिवसात तापमान घटणार
राज्यात येत्या दोन दिवसात किमान तापमानात कमालीची घसरण होणार असल्याचा हवामान विभागांना सांगितलं . उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात दोन ते चार अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याची शक्यता आहे . तर इतर ठिकाणीही हळूहळू तापमान घसरणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवले .
जळगावात निचांकी तापमानाची नोंद
उत्तर महाराष्ट्र सध्या चांगला गारठलाय . किमान तापमानात कमालीची घट झाली असून मंगळवारी (10 Dec) जळगावात नीचांकी 8 अंशांची नोंद करण्यात आली . तर कमाल तापमान रत्नागिरीत सर्वाधिक 34.5 अंश होते उत्तरेकडील शीत लहरी महाराष्ट्रच्या दिशेन येत असल्याने नाशिकमधे कडाक्याची थंडी पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातील तपमानात घट झाल्यान नाशिककर गारठले आहे. निफडमध्ये आज 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारच्या तुलनेत पार दोन अंशांनी वाढला असला तरीही गारवा कायम दिसतोय. शेकोटी पेटवून नागरिक ऊब घेत आहेत. रब्बी पिकांना थंडी लाभदायक असली तरी द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबईत गारठा वाढला
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळ मुंबईत तापमान घसरले आहे.सोमवारी मुंबईत महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमानचा पारा होता. सोमवारी 13.7 अंशांवर असलेला तापमानाचा पारा आज वर चढला आहे. पण थंडीचा जोर कमी झाला नाही. पुढील 5 दिवस हे राज्यात थंडीचे असणार आहेत.आज मुंबईत किमान तापमान हे 23 अंशांपर्यंत जाईल. तर कमाल तापमान 28 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.