नंदुरबार/मुंबई : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचे स्वीय सहाय्यक (PA) भगवानसिंग रामचंद्र गिरासे अखेर सुखरुप घरी पोहोचले आहेत. रात्री उशिरा ते नंदुरबारमधील आपल्या घरी परतले.


मुंबईतील टिळक भवन इथून शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून भगवानसिंह गिरासे बेपत्ता होते. दादर पोलिस स्टेशनमध्ये ते गायब झाल्याची तक्रार नोंदवली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून भगवानसिंग रामचंद्र गिरासे जेष्ठ नेते माणिकराव गवित यांच्यासोबत स्वीय सहायक म्हणून काम करत आहेत. तसंच नवापूर इथल्या शाळेत ते शिपाई म्हणूनही ते काम करतात.

आदिवासी असल्यामुळं अशी वागणूक देता का? खर्गे न भेटल्याने माणिकराव गावितांचा संताप

मात्र शनिवारपासून गायब झाल्यानंतर रात्री 12 :30 वाजता उशिरा माणिकराव गावित यांचे चालक संतोष झोडिया यांनी गिरासे बेपत्ता असल्याची तक्रार दादर पोलिस स्टेशनमध्ये दिली.

चालक संतोष यांनी दादर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, "शनिवारी तीन वाजता टिळक भवन इथली बैठक संपल्यावर माणिकराव गावित गाडीत बसून पुढे वांद्र्याकडे निघाले तर दुसऱ्या गाडीमध्ये गिरासे बसणार होते. पण ट्रॅफिकमुळे त्यांना मी पुढे येण्यासाठी सांगितले पण तेव्हापासून त्यांचा काही पत्ता नाही."

काँग्रेसला धक्क्यावर धक्के, माणिकराव गावितही पक्ष सोडण्याच्या तयारीत

भगवानसिंग रामचंद्र गिरासे अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या घरी चिंतेचं वातावरण होतं. परंतु आता ते सुखरुप घरी परतल्याने कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला आहे.

मात्र त्यांच्या अचानक बेपत्ता होण्याचं कारण अस्पष्ट आहे. मात्र ते घरी आल्यापासून कुटुंबीयांना त्यांच्यात अनेक बदल दिसत आहेत. त्यांनी टक्कल केला असून आल्यापासून त्यांनी तोंडातून एक शब्दही काढलेला नाही. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरील केस का गेले? न बोलण्याचं कारण काय? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

VIDEO | मल्लिकार्जुन खर्गेंची भेट न झाल्याने माणिकराव गावित संतापले