नंदुरबार : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान खासदार डॉ. हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार आणि नवापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिना गावितांवर आंदोलकांनी हल्ला केला होता. यात सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेवेळी त्या प्रचंड घाबरल्या होत्या. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी आदिवासी भागात पसरली.
नवापूरला तर रात्री नागपूर-सुरत महामार्ग बंद पाडण्यात आला होता. सोमवारी सकाळपासूनच नंदुरबार आणि नवापूरमध्ये बंदचा परिणाम दिसून आला. अनेक शाळांनी अघोषित शाळा बंद ठेवल्या. यावेळी जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्वाच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
मराठा समाजाकडून आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. शिवाय लोकप्रतिनिधिंनाही लक्ष्य केलं जात आहे. हिना गावित यांनाही याचाच फटका बसला. त्या काल धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन जात असताना आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर चढून काचा फोडल्या. हिना गावित यावेळी स्वतः गाडीमध्ये होत्या.
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही करावा लागला. शिवाय पोलिसांनी 15 ते 20 आंदोलकांना ताब्यात घेतलं. या घटनेचे पडसाद आज पाहायला मिळत आहेत.
हिना गावित या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार आहेत. आदिवासी समाजातील मोठे नेते विजयकुमार गावित यांच्या त्या कन्या आहेत.
खा. हिना गावितांवरील हल्ल्याचा निषेध, नंदुरबारमध्ये कडकडीत बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Aug 2018 11:23 AM (IST)
या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार आणि नवापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -