- नांदेडमध्ये काँग्रेसचे अमर राजुरकर विजयी (43 मतांनी विजय)
नांदेड विधानपरिषद - अशोक चव्हाण सर्वपक्षीयांना पुरुन उरले!
एबीपी माझा वेब टीम | 22 Nov 2016 12:50 PM (IST)
नांदेड: नांदेड विधानपरिषदेची जागा राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. अमर राजूरकर यांनी 251 मतांसह विजय मिळवला. काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर हे या निवडणुकीत दुसऱ्यांदा नशीब आजमावत होते. राजूरकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांचा 43 मतांनी पराभव केला. एकूण मतदानापैकी 12 मते बाद झाली. नांदेड विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, एमआयएम असे सर्व पक्ष काँग्रेसविरोधात एकत्र आले होते. मात्र या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हुकमी एक्क्याची भूमिका बजावल्याने, राजूरकर यांचा विजय झाला. राजूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू आहेत. त्यामुळे चव्हाणांसाठी ही निवडणूक त्यांचं नांदेडमधील भवितव्य आजमावणारी होती. अत्यंत चुरशी या निवडणुकीत अखेर काँग्रेसने बाजी मारली.