नांदेड: नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल सभा झाल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकाळी सभा होणार आहे.

या महापालिकेसाठी 11 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर 12 ऑक्टोबर 2017 रोजी याची मतमोजणी होईल.

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची मुदत 31 ऑक्टोबर 2017 रोजी संपणार आहे. एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी हे मतदान होणार आहे. त्यापैकी 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची सत्ता आहे. यावेळी भाजपनं जोर लावलाय.

भाजपला मंगळावरुन मिस्ड कॉल येतात, मेंबर करा : उद्धव

दरम्यान, कालच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.


यांचा पक्ष राज्यातला, देशातला, जगातला इतकंच काय तर चंद्रावरचाही सगळ्यात मोठा पक्ष आहे. मंगळावरुनही यांना मिस्ड कॉल येतात, आम्हाला मेंबर करुन घ्या, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली आहे. नांदेड महापालिकेच्या प्रचारानिमित्त उद्धव यांनी सभा घेतली.


पंतप्रधानांना कुठे दिवाळी दिसते माहीत नाही, मला तर दिसत नाही. साडेतीन वर्षात कधी जन्मगाव आठवलं नाही, मात्र गुजरात निवडणुका दोन महिन्यांवर आल्या असताना नरेंद्र मोदींना वडनगर आठवलं, तिथली शाळा आठवली, अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.


सविस्तर बातमीसाठी क्लिक करा