नांदेड : महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेदरम्यान दोन नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. पाणी प्रश्नावरुन सुरु झालेल्या वादात दोन्ही नगरसेवकांनी सभागृहाच्या वेलमध्ये येऊन जोरदार हाणामारी केली.

नांदेड माहापालिकेची विशेष अर्थसंकल्पीय सभा आज बोलावली होती. त्यावेळी भाजपचे नगरसेवक अभिषेक सौदे यांनी पाणी पुरवठ्याचा प्रश्न उपस्थीत केला. याला शिवसेनेनंही पाठिंबा दिला. परंतु, ही सभा अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी बोलावली असल्याने, या सभेत केवळ अर्थसंकल्पाबाबतच चर्चा व्हावी, अशी मागणी संविधान पक्षाचे बाळासाहेब देशमुख यांनी केली.

यानंतर बाळासाहेब देशमुख आणि भाजपचे अभिषेक सौदे यांच्यात शाब्दीक चकमक झाली. यानंतर याचं पर्यावसान हाणामारीत झालं. या घटनेनंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला होता.