नांदेड शहरातील सिडको परिसरात राहणाऱ्या एका महिले कडून पाच अल्पवयीन मुला मुलींचा वापर भीक मागण्यासाठी होत असल्याचे उघडकीस आलय. नांदेड शहरातील सिडको परिसरात राहणारी शिवकांता उर्फ अंजली सोळंके नावाच्या ह्या महिलेकडून अनाथ व गरीब नातेवाईकांच्या मुलांचा ह्या प्रकारे भीक मागण्यासाठी वापर केल्या जात आहे. सदर मुलांनी भीक न मागल्यास ह्या महिलेकडून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ होत असल्याची माहिती मिळालीय. त्यातील दोन मुले ही आपली असल्याचं शिवकांनुसाता सोळंके या महिलेचं म्हणणं आहे. परंतु त्या मुलांकडून माहिती घेतली असता भयाण वास्तव समोर आलय.
संबंधित महिला ही आपली नशेची भूक भागवण्यासाठी ह्या मुलांना भीक मागणे, भंगार वेचने अशी कामे करण्यास भाग पाडते. तर ही कामे न केल्यास त्यांना बेदम मारहाणही केल्या जाते.त्या महिलेच्या ताब्यात असणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांच्या अंगावर अशा प्रकारे मारहाण करून अत्याचार केल्याचा खुणा त्या चिमुकल्यांच्या अंगभर आहेत. ह्या मुलांना भीक मागवण्यासाठी सिडको परिसरातील ढवळे कॉर्नर येथे सदर महिला बसून राहते.हया मुलांनी भीक मागण्यास नकार दिल्यास सदर महिलेकडून मुलांना गंभीर मारहाण करत असल्याची माहिती खुद्द ह्या मुलांनी व त्या महिलेच्या नातेवाईकांनी दिलीय.तर भीक मागून जमा केलेल्या ह्या पैशातून सदर महिला नाशपाण करते व या मुलांना मारहाण करत असल्याची माहिती नांदेड चाईल्ड लाईन या संस्थेने ABP माझाला दिलीय.
सदर महिला अशा प्रकारे अल्पवयीन मुलांचा भीक मागण्यासाठी वापर करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नांदेड चाईल्ड लाईन ह्या संस्थेने सदर मुलांना आपल्या ताब्यात घेऊन बालगृहात टाकले होते. परंतु त्या नंतर सदर महिलेने त्यांच्या कार्यालयात येऊनही धिंगाणा घातला व मुले परत घेऊन गेल्याची माहिती दिलीय. तर सदर महिलेच्या तावडीतून ही मुले सोडवण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन नांदेड चाईल्ड लाईन या संस्थेने केलेय.तर पोलिसात या प्रकरणा विषयी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल न झाल्यामुळे पोलिसांनी ही बोलण्यास नकार दिलाय.