नांदेड : नांदेड जिल्ह्यात ओढ्याच्या पाण्यात बोलेरो जीप वाहून गेल्याची घटना घडली आहे. किनवट तालुक्यातील कोठारी पुलाजवळ रविवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
कोठारी परिसर हा तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. तिकडे झालेल्या पावसाने ओढ्याला मोठ्या प्रमाणात वाढल्याने ते कोठारी पुलावरुन वाहत होतं.
यावेळी बोलेरो चालक गंगासिंह पडवळने पुलावरुन पाणी वाहत असतानाही त्यावरुन जीप नेण्याचं नसतं धाडस केलं. गाडी पुलाच्या मध्यभागी पोहोचताच पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाखाली ती वाहून गेली. चालक तत्परतेने उडी मारुन बाहेर आल्याने जीवितहानी टळली.
नांदेडमध्ये ओढ्याच्या पाण्यात बोलेरो जीप वाहून गेली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Sep 2018 10:38 AM (IST)
कोठारी परिसर हा तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. तिकडे झालेल्या पावसाने ओढ्याला मोठ्या प्रमाणात वाढल्याने ते कोठारी पुलावरुन वाहत होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -