गांधी मैदानावर दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तेथे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं आगमन झालं. शिवेंद्रराजे आल्यानंतर उपस्थित तरुणवर्गात एकच उत्साह संचारला. एकंदरीत उत्साहाचं वातावरण असतानाच, मोठ-मोठ्याने गाणी लावण्यात आली.
‘मैं हूँ डॉन... मैं हूँ डॉन’ हे गाणं तिथे वाजवण्यात आल्यानंतर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही गाण्यावर ठेका धरला. मग काय... उपस्थित तरुणांनीही एकच जल्लोष सुरु केला.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पहिल्यांदाच अशाप्रकारे जाहीर व्यासपीठावरुन गाण्यावर ठेका धरला. त्यामुळे उपस्थितांना हे चित्र पाहताना मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता.
आतापर्यंत खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांच्या हटके स्टाईलमध्ये सातारकरांनी पाहिले होते. मात्र शिवेंद्रराजेही जनतेत मिसळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ :