काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना बालेकिल्ल्यातच धक्का
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2017 04:22 PM (IST)
सरजीत सिंह गिल, स्नेहा पांढरे, किशोर यादव आणि नवल पोकर्णा अशी चौघा नगरसेवकांची नावं आहेत. किशोर यादव वगळता उर्वरित तिघांचं यापूर्वीच भाजपशी संधान असल्याचं म्हटलं जातं.
नांदेड : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी राजीनामे देऊन भाजपची वाट धरली आहे. नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. महापालिका आयुक्तांकडे चौघांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. चारही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सरजीत सिंह गिल, स्नेहा पांढरे, किशोर यादव आणि नवल पोकर्णा अशी चौघा नगरसेवकांची नावं आहेत. किशोर यादव वगळता उर्वरित तिघांचं यापूर्वीच भाजपशी संधान असल्याचं म्हटलं जातं. नांदेड महापालिकेवर काँग्रेसची सत्ता असून सध्या पालिकेत काँग्रेसचे 41 नगरसेवक आहेत. तर भाजपचे 2 नगरसेवक निवडून आले होते.