राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने गुरुवारपासून (21 फेब्रुवारी) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. पानभोसीमधील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी (22 फेब्रुवारी) हिंदी विषयाची परीक्षा होती. परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच प्रश्न बाहेर आले. काही तरुण एका प्रश्नाच्या उत्तराची 100 रुपयांना विक्री करत होते. तर उत्तर थेट परीक्षार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी हजार रुपये लागतील, असं सांगत होते. शेजारीच असलेल्या बारुळ इथल्या श्री. शिवाजी विद्यालयातही असाच प्रकार सुरु होता.
नांदेड जिल्ह्यात 81 केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरु आहे. 261 कनिष्ठ महाविद्यालयातील 37 हजार 782 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मोबाईलवर निर्बंध असतानाही काही जण सर्रास वापर करत करत होते. परीक्षा केंद्रबाहेर कॉपी पुरवण्यासाठी तरुण होते. काही जण केंद्राच्या खिडकीत जाऊन आत उत्तराच्या चिठ्ठ्या टाकत होते.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करणार असून शनिवारी (23 फेब्रुवारी) संबंधित परीक्षा केंद्रावर भरारी पथक पाठवण्यात येईल, असं गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं.
वेबसाईट व्हिडीओ
यूट्यूब व्हिडीओ