भरपूर कॉपी, 1000 टक्के पास होणार, पोलिसाकडूनच हमी
एबीपी माझा वेब टीम | 28 Feb 2018 08:48 PM (IST)
आतमध्ये भरपूर चिठ्ठ्या (कॉपी) असल्यामुळे कोणीही नापास होणार नाही, अशी हमी नांदेडमधील परीक्षाकेंद्राबाहेर पोलिस देत आहे.
नांदेड : परीक्षा सुरु असताना केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ न देण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र नांदेडमध्ये चक्क पोलिसच परीक्षा केंद्रावर कॉपी चालणार, याची एक हजार टक्के गॅरंटी देत आहे. आतमध्ये भरपूर चिठ्ठ्या (कॉपी) असल्यामुळे कोणीही नापास होणार नाही, अशी हमीसुद्धा पोलिस देत आहे. बारावीच्या परीक्षा सुरु असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला असून ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. कुंपणच शेत खात असेल, तर नेमकं जायचं कोणाकडे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. श्रीकर परदेशी नांदडेचे जिल्हाधिकारी असताना कॉपीमुक्त जिल्हा म्हणून नांदेडची ओळख होती. पण आता याच भागातल्या परीक्षा केंद्रांची स्थिती बघितली, तर नांदेड जिल्ह्या कॉपीयुक्त होत आहे की काय, असा प्रश्न पडतो. पाहा व्हिडिओ :